Posts

Image
   कराडच्या चारुदत्त साळुंखे याची UPSC-IES परीक्षेत देशात प्रथम येत विजयी पताका सातारा जिल्ह्यात कराड येथील चारुदत्त साळुंखे याने UPSC-IES परीक्षेत देशात प्रथम येत विजयी पताका लावली आहे. सातारा  : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील इतिहास घडवू शकतात याचंच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे चारुदत्त साळुंखे. कराडच्या चारुदत्त साळुंखे याने UPSC-IES परीक्षेत देशात प्रथम येत विजयी पताका लावली आहे. सर्वसामान्य घरातून आलेला चारुदत्त ग्रामीण भागातील मुलांसाठी आदर्श आहे. मूळचे चाफळ (ता. पाटण जि. सातारा) सारख्या ग्रामीण भागातील रहिवासी असणाऱ्या आणि प्राथमिक शिक्षण आदर्श प्राथमिक विद्यामंदिर कराड येथून पूर्ण करुन इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी हायस्कूल कराड येथून दहावीला 94.55 टक्के गुणांसह उत्तीर्ण करणाऱ्या चारुदत्त साळुंखे याची यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चीतच प्रेरणादायी आहे. खाजगी संस्थेत क्लर्क असणाऱ्या मध्यमवर्गीय मोहनराव साळुंखे आणि प्राथमिक शिक्षक असणाऱ्या संगिता साळुंखे यांचा मुलगा चारुदत्त साळुंखे याने दहावीच्या परीक्षेत